सोमेश्‍वरनगर अत्याचारप्रकरणी नराधमाला कोठडी

सोमेश्‍वरनगर/ करंजे- सोमेश्‍वरनगर परिसरातील एका 11 वर्षाच्या शालेय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायाधीश ए. एम. राजकारणे यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संभाजी पोपट शेंडकर (वय 43, रा. शेंडकवाडी, ता. बारामती) असे कोठडी सुनावण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, नराधम संभाजीने शनिवारी (दि. 26) सायंकाळी सोमेश्‍वरनगर परिसरातील एका 11 वर्षांच्या शालेय मुलीला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून नेवून दोनवेळा अत्याचार केला होता, त्यानंतर पीडित मुलीली रात्री अकराच्या सुमारास त्याने मोटारसायकलवर रस्त्याजवळ सोडले व त्याने धूम ठोकले होती. त्यानंतर पीडिता घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस ठाण्यात फिर्यादिच्या आईने फिर्याद दिली त्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली. रात्रभर सीसीटिव्ही तपासून आरोपीचा छडा लावला. मात्र आरोपी दौंड तालुक्‍यात केडगाव रेल्वे स्टेशवरून परराज्यात जाण्याच्या तयारीत होता. त्यावेळी केवळ मोबाईल लोकेशनवरुन त्याला पकडले. दरम्यान, या गुन्ह्याची कबुली त्याने दिली असून त्या अल्पवयीन मुलीवर दवाखान्यात अद्याप उर्वरीत तपासणी व वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
या नराधमाला आज (सोमवारी) बारामतीच्या जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश ए. एम. राजकारणे यांनी तीन दिवसांची म्हणजेच बुधवार (दि. 30) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

  • नराधम शेंडकरवरही याआगोदरही अनेक गुन्हे
    नराधम संभाजी शेंडकरवर या अगोदर देखील काही गुन्हे दाखल आहेत. तर याप्रकरणात त्याच्यावर बाल लैंगीक अत्याचार तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक व अपहरण, बलात्कार आदी कलमाखाली गुन्हा दाखल आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)