सोमेश्‍वरनगरात हार्वेस्टरद्वारे गहू काढणी

यंदा मुबलक पाणी, पोषक वातावरणामुळे भरघोस उत्पादन

सोमेश्‍वरनगर- बारामती तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात यंदा मुबलक पाणी आणि गहू पिकासाठी पोषक वातावरण मिळाल्याने परिसरात गव्हाचे पीक चांगले आले आहे. त्यामुळे यावर्षी गव्हाच्या उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्‍त केली आहे. सध्या परिसरात हार्वेस्टरद्वारे गहू काढणीला आणि मळणीच्या कामात शेतकरी मग्न झाला आहे.

गहू पीक तीन ते साडेतीन महिन्यांच्या कालावधीत घेतले जाणारे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. उत्तम व्यवस्थापन नियोजन केल्यास भरघोस उत्पादन देखील अनेक शेतकरी घेताना दिसतात. यावर्षी थंडीचे प्रमाण वाढल्याने गहू पिकाला पोषक असे वातावरण मिळाल्यापने मुरुम, वाणेवाडी, वाघळवाडी, निंबुत, गडदरवाडी,खंडो बाचीवाडी,करंजे, करंजेपुल, होळ वाकी, चोपडज परिसरात शेतकऱ्यांना भरघोस असे गव्हाचे उत्पादन आले आहे. या बागायती भागात सध्या मजूर वर्ग उपलब्ध नसल्याने शेतकरी कमी वेळेत आणि कमी कष्टात हार्वेस्टर यंत्राणे गव्हाची काढणी करीत आहेत. या परिसरात पंजाब, हरीयाणा या राज्यातून यंत्रचालक दाखल झाले आहेत. हे यंत्रचालक स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांकडून गहू काढणीसाठी एकरी दोन हजार रुपये घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)