“सोमेश्‍वर’च्या गाळप हंगामाची सांगता

  • कारखान्यात 9 लाख 79 हजार 90 मे. टन उसाचे गाळप

सोमेश्‍वरनगर – सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने 2017-18 च्या गाळप हंगामात 9 लाख 79 हजार 920 मे. टन उसाचे गाळप केले असून 11 लाख 73 हजार 150 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी हंगाम समाप्तीच्या समारोपप्रकरणी व्यक्‍त केली.
सोमेश्‍वर कारखान्याने 172 दिवसांत एकही क्‍लिनींग न घेता कमी लॉसेसमध्ये उच्च प्रतिची साखर निर्मिती करीत सभासद व बिगर सभासद यांचा एकूण 9 लाख 79 हजार 920 इतके कारखान्याने आज अखेर उसाचे गाळप करून पुणे जिल्ह्यात क्रमांक एकचा सरासरी 11.99 टक्केचा साखर उतारा राखून 11 लाख 73 हजार 150 क्विंटल जिल्ह्यात उच्चांकी साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातून 9 कोटी 25 लाख 38 हजार 253 युनिटची निर्मिती केली असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीस 6 कोटी 25 लाख 82 हजार युनिट्‌सची वीज एक्‍सपोर्ट केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून सरासरी 271.370 लि. मे. टनची रिकव्हरी राखून 72 कोटी 52 लाख 401 हजार लिटर अल्कोहोलचे उत्पादन व 31 कोटी 94 लाख 949 हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले असल्याची माहिती त्यांनी दिली.
गाळप हंगाम पार पडत असताना सभासदांचा 8 लाख 48 हजार 322 मे. टन शेअर मागणीदार यांचा 29 हजार 103 मे. टन कार्यक्षेत्राबाहेरील बिगर सभासदांचा 9 हजार 240 मे. टन व कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेनधारकांचा 93 हजार 254 मे. टन ऊस असे एकून 9 लाख 79 हजार 920 मे. टन उसाचे गाळप कारखान्याने केले आहे, असे त्यांनी नमूद केले.

  • 2642.28 प्रमाणे पेमेंट बॅंक खात्यात वर्ग
    या उसाचे गाळप करत असताना एफआरपीप्रमाणे दि. 31 मार्च अखेर 2642.28 रूपये प्रति मे. टन या दराने सभासदांचे पेमेंट सभासदांच्या बॅंक खात्यावर वर्ग केले असून सध्या प्रतक्विंटल 2700 रूपये दराप्रमाणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मुल्यांकन करीत असून त्यामधून 15 टक्के मार्जिंग मनी ठेऊन उर्वरित 2295 रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे बॅंकेकडून कारखान्यास उचल प्राप्त होत, असल्याची माहिती पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
  • येणाऱ्या हंगामात येणारा ऊस
    सोमेश्‍वर कारखान्यात 2018-19 या गाळ हंगामात पुरंदर तालुक्‍यातून 8870.18, बारामती तालुक्‍यातून 18650.19, फलटण तालुक्‍यातून 673.09, खंडाळा तालुक्‍यातून 1930.21 असा एकूण 30124.27 हेक्‍टर ऊस गाळपासाठी येणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)