सोमेश्वर स्कुलमध्ये करिअर मार्गदर्शन मेळावा

करंजे- सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील मधील विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये पालक-शिक्षक संघाच्या वतीने येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एनडीएमध्ये ट्रेंनिग घेत असलेले बारामती तालुक्‍यातील कोह्याळे या गावातील मुकुल इंगळे यांनी एनडीएच्या प्रवेशासंदर्भात विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि उपस्थित विध्यार्थ्यांच्या विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत, त्यांच्याही शंका दूर केल्या. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय योगिता भोसले यांनी केला, तर अर्पणा जेधे यांनी कार्यक्रमाचे नियोजन संकल्पना स्पष्ट केली. साधना माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)