सोमेश्वर मंदिरात परिसरात घेतली विंधन विहीर

सोमेश्वरनगर- बारामती तालुक्‍यातील श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थानच्या तळाची खोली वाढवून पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, दुष्काळाची दाहकता वाढली व पावसाअभावी तळे कोरडे पडले आहे. यामुळे परिसरात विंधन विहीर घेतल्यामुळे भाविकांसह परिसरातील जनतेला ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळाला आहे.

मुरुम (ता. बारामती) येथील उद्योजक नंदकुमार शिंगटे यानी मंदिर परिसरात विंधन विहीर घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला विश्वस्त समितीद्वारे मान्यता देण्यात आली. त्यांतर त्यांनी स्वखर्चाने विंधन विहीर घेतली. त्याचबरोबर त्याचे पाईप व मोटार असा सुमारे 55 हजाराचा खर्च त्यांनी स्वत: करून देवस्थानला पाण्याची सोय उपलब्ध करुन दिली. विश्वस्त समितीचे अध्यक्ष विनोद भांडवलकर, सचिव सुनील भांडवलकर, गणेश आळंदीकर व डॉ. कुलदीप काकडे यांनी त्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)