सोमेश्वर कारखान्याच्या विस्तारवाढीला नकार

शेतकरी कृती समिती अध्यक्ष सतीश काकडे यांची महिती
व्हीएसआयच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर निर्णय

सोमेश्वरनगर – सोमेश्वर कारखान्याच्या विस्तारवाढीसाठी कारखान्याने 14 लाख 77 हजार टन ऊस येईल, असे गृहीत धरल्याची माहिती व्हीएसआयच्या तज्ज्ञांनी दिली असली तरी इतका ऊस कधीच उपलब्ध होऊ शकत नाही. यामुळे आम्ही कारखान्याच्या विस्तारीकरणास नकार दिला आहे, अशी माहिती शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी दिली. यामुळे सध्या तरी कारखान्याच्या विस्तारवाढीचा मुद्दा थांबला आहे.

सोमेश्वर कारखान्याने 112 कोटी रूपये खर्चून सहविजनिर्मितीसह विस्तारवाढ करणे, असा निर्णय वार्षिक सभेत घेतला होता. परंतु, कृती समितीने स्वस्तातला पर्याय सुचवत विरोध केला. याबाबत अजित पवार यांनी मध्यस्थी करून कृती समिती व संचालक मंडळाची एकत्रित चर्चा गुरूवारी (दि.29) घडवून आणली. चर्चेनंतर व्हीएसआय या नामांकित संस्थेच्या तज्ज्ञांना बोलावून निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या, त्यानुसार आज व्हीएसआयचे तज्ञ चांदगुडे, शितनाळे यांच्यासोबत कृती समितीचे सतीश काकडे, प्रमोद काकडे, बाळासाहेब जगताप, मदन काकडे, रोहित जगताप, अजय कदम आदींची चर्चा झाली.

याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, उपाध्यक्ष लक्ष्मन गोफणे व संचालक मंडळ उफस्थित होते. उसाचे क्षेत्र जास्त का धरले? असे संचालक मंडळाला विचारले असता त्यांनी कृषी विभाग व हवामान खात्याने जो अंदाज केला आहे त्या आधारे सुचविल्याप्रमाणे उसाचे आकडे आहेत, असे सांगितले. बारामतीत 7762 हेक्‍टर, पुरंदरमध्ये 3712 हेक्‍टर व खंडाळा आणि फलटणमध्ये 2273 हेक्‍टर ऊस धरून डीपीआर बनविला आहे. यावर समितीच्या कार्यकर्त्यांनी 12 ते 13 लाख टन ऊस मिळणार नाही, हे ठाम सांगितले. यानंतर 12 लाख टन उस मिळाला पाहिजे. अन्यथा आठ लाख टन उस मिळाला तर तोटा होईल, हे तज्ज्ञांनी स्पष्ट सांगितले. यामुळे कृती समितीने खोटी आकडेवारी सादर करून करणार असलेल्या विस्तारवाढीस नकार दिला. केवळ 500 टनांनी वाढ करण्याबाबतचा नवा प्रस्ताव व्हीएसआयने तयार करावा, अशी मागणी केल्याचे काकडे यांनी सांगितले. तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्प वाढीसही कृती समितीने विरोध दर्शविला. वीजखरेदी जोपर्यंत शासन मान्य करीत नाही तोपर्यंत यावर चर्चा नको, असे सांगितले. यावर वीजखरेदी ही कारखान्यांची जबाबदारी आहे, व्हीएसआयची नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)