सोमेश्वरनगर परिसरात मशागतीच्या कामास वेग

करंजे- सोमेश्‍वरनगर परिसरात शेती मशागतीच्या कामात सध्या शेतकरी व्यस्त असून उन्हाचा पारा वाढण्या आधीच ही कामे उरकून घेण्यास शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
सोमेश्‍वर कारखान्याचा गाळप हंगाम संपल्यानंतर मोकळ्या झालेल्या शेतामध्ये नांगरणे, काकर मारणे, रोटावेटर मारणे आदी कामांमध्ये शेतकरी सध्या गुंतलेला आहे. काही शेतकऱ्यांचा ऊस सुरुवातीलाच गाळपास गेल्यानंतर त्यांनी गव्हाचे आणि इतर पिकांचे उत्पादन घेतले होते. याचा दुहेरी फायदा या परिसरातील शेतकऱ्यांना झाला होता. ज्या शेतकऱ्यांचा ऊस गाळप हंगाम संपताना गेला आहे असे शेतकरी पुढील पिकांसाठी शेत तयार करीत आहेत. सोमेश्‍वरनगर परिसरातील मुरुम, वाघळवाडी, वाणेवाडी, निंबुत, सोरटेवाडी, होळ, करंजे, करंजेपूल आणि परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र असून वेळ आणि पैसा वाचवत काही शेतकऱ्यांनी त्याच उसाचे खोडवा ठेवणे पसंत केले आहे तर काहि शेतकऱ्यांना तरकारी पीके घ्यावयाची असल्याने ते शेतकरी शेतजमीनीची मशागत करून घेत आहेत. कारखान्यांचा ऊस लागवड हंगाम जुलै महिन्यापासून सुरु होत असल्याने ऊसाची लागवड करण्यासाठी शेतकरी शेतजमीन नांगरून ठेवत आहेत. तर परिसरात मुबलक पाणी असल्याने शेतकरी तरकारी पिकांकडे वळला असून जनावरांच्या चाऱ्यासाठी मशागत करणे गरजेचे असून शेतकरी त्यासाठी धावपळ करीत आहेत.

  • ट्रक्‍टरने शेतजमिनीची नांगरणी करण्यासाठी 2 हजार 500, काकरणेसाठी 1 हजार 500 तर ऊसाचे पाचट कुटी करण्यासाठी रोटावेटर मारण्यासाठी 1 हजार 500 रुपये एकरी दर शेतकऱ्यांकडून आकारला जात आहे.
    – अतुल रासकर, ट्रॅक्‍टर मालक

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)