सोमुर्डी गावात स्वच्छता अभियान

गराडे – परींचे आरोग्य केंद्रा अंतर्गत असलेल्या गराडे येथील आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य दिना पासुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य केंद्रा अंतर्गत असलेल्या सोमुर्डी गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल निताणीकर, डॉ. स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता, प्रत्येकासाठी, प्रत्येक ठिकाणी या घोषवाक्‍याबद्दलची माहीती आरोग्य सेविका मोहिनी पारखे यांनी ग्रामस्थांसह मुले, मुली तसच वयोवृद्धांना दिली. गावात प्रभात फेरी काढून आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत सरपंच सुनील पवार, मोहिनी श्रीकृष्ण पारखे, स्वयंसेविका सारीका आहेरकर, सोनाली जगदाळे, ज्योती शेलार, प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले असून ही मोहिम दि. 15 एप्रिल पर्यंत गावात राबविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)