सोमालियात आत्मघातकी बॉम्बस्फोटाने 3 ठार

संग्रहित छायाचित्र

मोगादिशू (सोमालिया): सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये रविवारी एका आत्मघातकी कार बॉम्बच्या स्फोटात तीन सुरक्षा रक्षक मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले आहेत. इस्लामी कट्टरवादी संघटना अल शबाबने तातडीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयाला लक्ष्य करण्यासाठी हा स्फोट घडवून आला होता, असे मोगादिशूच्या प्रशासकीय प्रवक्‍त्याने सांगितले. या स्फोटादरम्यान ठार झालेले तिघेही जिल्हा प्रशासनाच्या इमारतीय्चा प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक होते. या स्फोटामुळे या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. या स्फोटामुळे शेजारील शाळा आणि एका मशिदीचेही नुकसान झाले. एकूण 8 जण जखमी झाले आहेत. त्यात शेजारील मदरशात राहिलेल्या काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
सोमालियातील सरकार उलथवून टाकण्यासाठी कट्टरवाद्यांकडून 2011 पासून हिंसाचार घडवला जात आहे. सोमालियातील ग्रामीण भागात या दहशतवादी संघटनेचा प्रभाव अधिक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)