सोमाटणे ग्रामपंचायतीतर्फे शाळांना खेळाचे साहित्य वाटप

सोमाटणे – येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी, सोमाटणे गाव व चौराईनगर आदी भागातील शाळांमध्ये तसेच अंगणवाडी शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने वेगवेगळ्या खेळांचे व सांस्कृतिक कार्यक्रमांना लागणारे साउंड, माईक असे विविध साहित्य तसेच प्रयोग करण्यासाठी लागणारे साहित्य आदी वाटप करण्यात आले.

या बरोबरच दैनंदिन वापरासाठी लागणारे साहित्य, टेबल, खूर्ची, काही भांडी आदी साहित्य देखील देण्यात आले. या वेळी सरपंच नलिनी गायकवाड, उपसरपंच सुजाता मुऱ्हे, उद्योजक अविनाश मुऱ्हे आदींसह शाळेचे मुख्याध्यापक देवीप्रसाद तावरे, अंगणवाडी सेविका मंगल पडवळ, मदतनीस शैला जगदाळे उपस्थित होत्या. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या सुप्रांची मुऱ्हे, स्वाती कांबळे, अरुणा माळी, अविनाश मुऱ्हे व शाळेतील शिक्षक आशा काळोखे, शीतल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)