सोमाटणे गावात श्री चौराई देवी उत्सव उत्साहात साजरा

सोमाटणे – ग्रामदैवत श्री चौराई देवी उत्सवानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेत मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचा पैलवान अक्षय शिंदे याने विजय मिळवला व 75 हजार रोख व चांदीच्या गदावर आपले नाव कोरले.

खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमात ज्योती अनंता गायकवाड पैठणीच्या मानकरी ठरल्या. द्वितीय क्रमांकांची सोन्याची नथ जानव्ही पोटे, तृतीय क्रमांकाचा चांदीचा छल्ला सुजाता मुऱ्हे यांनी पटकावला. चार दिवस उत्सवात विविध धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम झाले होते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी चौराई देवीला महाभिषेक व आरती झाली. सायंकाळी वाजत-गाजत चौराई देवीची भव्य पालखी व छबीना मिरवणूक काढण्यात आली. पालखीचे ठिकठिकाणी ग्रामस्थांनी फुलांची उधळण करून आतषबाजीत स्वागत केले. सायंकाळी भिका भीमा सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला.

दुसऱ्या दिवशी नामवंत मल्लांचा कुस्ती आखाडा झाला. यामध्ये अनेक पैलवानांनी हजेरी लावली. गुरुकुल कुस्ती संकुलाची महिला पैलवान प्रगती गायकवाड हिने पुरुष पैलवानास चीतपट करून कुस्ती जिंकली. उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सिने अभिनेत्री क्रांती माळेगावकर यांचा सोमाटणे न्यू होम मिनिस्टर हा खेळ रंगला पैठणीचा खास महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास उत्सव समिती अध्यक्ष राकेश मुऱ्हे, खजिनदार विकास मुऱ्हे, सहखजिनदार सुधीर मुऱ्हे, उपाध्यक्ष प्रशांत दत्तात्रय मुऱ्हे, कुलदीप मुऱ्हे, विश्वजित मुऱ्हे, सचिव अनंता आंद्रे, सहसचिव प्रवीण प्रल्हाद मुऱ्हे, बाळासाहेब वाडेकर व ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)