सोमाटणेमध्ये “बसवाले काकां’ चा वृक्षारोपण संदेश

पर्यावरणाभिमुख : दीडशे रोपांचे विद्यार्थ्यांना वाटप

सोमाटणे वार्ताहर) – सोमाटणे येथील “बसवाले काका’ हनुमंत मुऱ्हे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण संकल्प केला. उद्योजक अविनाश मुऱ्हे, सचिन मुऱ्हे, लायन क्‍लबचे भूपेंदरसिंग डुलत, सरपंच नलिनी गायकवाड, उप सरपंच सुजाता मुऱ्हे, माजी उपसरपंच राकेश मुऱ्हे, निलेश मुऱ्हे, गोकुळ गायकवाड, सोमनाथ मुऱ्हे, अजय मुऱ्हे यांनी उपक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांना दीडशे रोपे दिली.

30 वर्षांपासून विना अपघात हनुमंत मुऱ्हे विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करतात. तसेच विद्यार्थ्यांची देखील कोणतीही तक्रार नाही. याबद्दल गेल्या वर्षी मुऱ्हे यांना आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरवण्यात आले. समाजाचे काही तरी देणे लागतो, या उदात्त हेतूने मुऱ्हे यांनी अनेक गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले. तसेच काही विद्यार्थ्यांची शालेय फी भरण्यासाठी देखील आर्थिक मदत केली. काही मुलांना दत्तक देखील घेतले आहे. यावर्षी त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी अनोखा उपक्रम राबवून प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप भेट दिले.

त्याचबरोबर जो कोणी ते रोपे जागवेल व वाढवेल त्यास पुढील शैक्षणिक वर्षात एका महिन्याचे गाडीभाडे माफ करण्यात येईल, अशी योजना आखली. त्यास विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमाविषयी मुऱ्हे म्हणाले, मला मिळणाऱ्या उत्पन्नातून काही रक्कम मी समाजातील गरजूंना मदत देतो. त्यातून मला मोठे समाधान मिळते. यापुढेही हा उपक्रम विविध पातळींवर चालू ठेवणार असून गावात “घर तेथे वृक्ष’ उपक्रम राबवणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)