सोमाटणेत वीजबिल भरणा केंद्राचे उद्‌घाटन

सोमाटणे : येथे पीडीसीसी बॅंकेच्या शाखेत वीज बिल भरणा केंद्राचे उद्‌घाटन करताना अर्चना घारे, बाळासाहेब नेवाळे, राजाराम राक्षे, साहेबराव कारके आदी.

सोमाटणे, (वार्ताहर) – सोमाटणे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेत वीजबिल भरणा केंद्राचे उद्‌घाटन बॅंकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे व संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठी सुविधा निर्माण झाली आहे.

सोमाटणे परिसरातील ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी बेबेडओहोळ व तळेगाव दाभाडे येथील शाखेत जावे लागत होते. सोमाटणे हे मध्यवर्ती ठिकाण असून, देखील या ठिकाणी ग्राहकांना सुविधा मिळत नव्हती. त्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत होती. यासंदर्भात विविध पातळ्यांवर नागरिकांनी वारंवार मागणी करत बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा केला. त्यामुळे पवन मावळच्या पूर्व भागातील नागरिकांची सोय झाल्याने नागरिकांनी मोठा आनंद व्यक्‍त केला. उद्‌घाटन प्रसंगी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजाराम राक्षे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, रमेश गायकवाड, उत्तमराव बोडके, भरत भोते, सरपंच नलिनी गायकवाड, उपसरपंच सुजाता मुऱ्हे, विष्णू मुऱ्हे, राजेश मुऱ्हे, प्रवीण मुऱ्हे, राकेश मुऱ्हे, सुधीर मुऱ्हे, संगीता गोपाळे, अविनाश मुऱ्हे, धनंजय राक्षे, चिमाजी सावंत, सचिन मुऱ्हे, विशाल मुऱ्हे, नितीन मुऱ्हे, आत्माराम मुऱ्हे, नंदकुमार गराडे, उत्तम घोटकुले, संदीप मुऱ्हे आदी उपस्थित होते.

या विषयी अर्चना घारे म्हणाल्या की, सोमाटणे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे वीज बिल भरणा केंद्राची आवश्‍यकता होती. या सुविधेमुळे महिला व वयोवृद्ध यांच्या बरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही तात्काळ वीज बिल भरता येणार असल्याने वेळ व पैशाची बचत होईल, असे मत व्यक्‍त केले.

बाळासाहेब नेवाळे म्हणाले की, या केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत होईल. या कार्यक्रमासाठी माजी सरपंच नवनाथ मुऱ्हे, संदीप मुऱ्हे, सुधीर मुऱ्हे, सुरेखा जगदाळे, नंदकुमार गराडे, आत्माराम मुऱ्हे, धनंजय राक्षे, ऍड. जगन्नाथ गोपाळे व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मुऱ्हे यांनी केले. राजेश मुऱ्हे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)