सोमाटणेच्या उप सरपंचपदी सुजाता मुऱ्हे बिनविरोध

सोमाटणे, (वार्ताहर) – सोमाटणे ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत उपसरपंचपदी सुजाता अविनाश मुऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच नलिनी गायकवाड होत्या. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक गोपिनाथ खोमणे यांनी काम पाहिले. ठरल्याप्रमाणे मावळते उपसरपंच राकेश शहाजी मुऱ्हे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्‍त झाले होते.

मावळते उपसरपंच राकेश मुऱ्हे, माजी उपसरपंच आशा मुऱ्हे, ग्रामपंचायत सदस्य उमेश जव्हेरी, पूजा मुऱ्हे, गोकुळ गायकवाड, अरुणा माळी, सचिन मुऱ्हे, सुरेखा जगदाळे, सुधीर मुऱ्हे, स्वाती कांबळे, सुजाता मुऱ्हे आदी विशेष सभेस उपस्थित होते. मुऱ्हे यांच्या निवडीबद्दल राजेश मुऱ्हे, तंटामुक्‍ती अध्यक्ष विष्णू मुऱ्हे, दत्तोबा मुऱ्हे, शहाजी मुऱ्हे, मच्छिंद्र मुऱ्हे, नितीन मुऱ्हे, मधुकर मुऱ्हे, प्रकाश जगदाळे, माजी सरपंच संदीप मुऱ्हे, संतोष मुऱ्हे, विशाल मुऱ्हे, अविनाश मुऱ्हे, माजी आदर्श सरपंच मंगल राजेश मुऱ्हे, उर्मिला संदीप मुऱ्हे, नवनाथ गंगाराम मुऱ्हे आदींनी अभिनंदन केले. उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सुजाता मुऱ्हे यांचा ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार झाला. ग्रामस्थांनी भंडारा उधळून आनंदोत्सव साजरा केला.

-Ads-

माझ्यावर विश्‍वास ठेवून जबाबदारी टाकली आहे. तिला मी समर्थपणे पेलण्याचा पूर्ण प्रत्यत्न करीन. गावातील जास्तीत जास्त विकास कामे करून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देईल, असे सुजाता मुऱ्हे यावेळी म्हणाल्या.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)