सोमवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक 

नवी दिल्ली – संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. अधिवेशनातील कार्यक्रम पत्रिका या बैठकीपुढे ठेऊन पंतप्रधान या संबंधात अशा बैठकांमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करीत असतात. येत्या एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणूका होणे अपेक्षित असल्याने त्या आधी होणारे हे लोकसभेचे अखेरचे पुर्ण अधिवेशन असेल.

पाच राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकांवर देशाचे बरेचसे राजकारण अवलंबून असणार आहे त्यामुळे या बैठकीवर त्या राज्यातील निवडणूक निकालांचे सावट असेल. या निवडणुकांची मतमोजणी 11 डिसेंबरला होणार आहे त्याच्या आदल्या दिवशी ही बैठक होणार आहे. ट्रिपल तलाकचा विषय संसदेत मार्गी लावणे हे सरकारपुढील महत्वाचे लक्ष आहे. हा प्रस्ताव अद्याप राज्यसभेत प्रलंबीत आहे. त्यासाठी विरोधकांचे सहकार्य मिळावे असे आवाहन या बैठकीत सरकारकडून केले जाण्याची शक्‍यता आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)