सोमवारपासून पिंपळे-गुरवला दीपावली संगीत महोत्सव

पिंपळे-गुरव – पिंपळे-गुरवला आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवार तर्फे सोमवार दि. 5 पासून नटसम्राट निळुभाऊ फुले नाट्यगृहात दीपावली संगीत महोत्सव असून या निमित्त परिसरातील नागरिकांना सांगितिक मेजवानी मिळणार आहे. सोमवार दि. 5 ला धनत्रयोदशीला पहाटे 5 पासून दिवाळी पहाट संगीत महोत्सव सुरू होत आहे. योगिता गोडबोले, संदीप उबाळे, वैदही फडके गायनाविष्कार सादर करतील. योगेश सुपेकर निवेदन करतील. मंगळवार दि. 6 ला नरक चतुर्दशीला ज्ञानेश्वर मेश्राम, राधिका अत्रे, सागर म्हात्रे यांचे गायन होईल. संतोषकुमार संगीत संयोजक करणार आहेत. बुधवार दि. 7 ला लक्ष्मी पूजनाला स्वप्निल बांदोडकर, ज्योती गोराणे, सोहम गोराणे गायन कला सादर करतील. शाम गोराणे संगीत संयोजन करतील. गुरुवार दि. 8 ला बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याला गुरुप्रसाद नानिवडेकर, दशरथ चव्हाण, शर्मिला शिंदे यांच्या गायनाने संगीत महोत्सवाची सांगता होईल. नामदेव तळपे निवेदन करतील.

25 हजार दिव्यांचा दीपोत्सव
दिवाळी पाडव्याला संध्याकाळी 6 वाजता सांगवी व पिंपळे-गुरव परिसरातील सर्व धर्माच्या प्रार्थना स्थळांमध्ये 25 हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा होईल, असे संयोजकांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)