सोमवारपासून अकरावी माहितीपुस्तिका वितरण

पुढील महिन्यापासून अर्जप्रक्रिया होणार सुरू : मिनाक्षी राऊत यांची माहिती

पुणे – अकरावी प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज भरण्यास मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू केले जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लागणाऱ्या माहिती पुस्तिका विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत 23 एप्रिलपासून मिळणार आहेत, अशी माहिती अकरावी प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मिनाक्षी राऊत यांनी दिली.

यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी अकरावी प्रवेश प्रक्रिया कशी राबवावी, यासाठी गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी बैठक झाली. यात राऊत यांनी प्रवेश प्रक्रियेशी निगडीत असणारे मुख्याध्यापक, प्राचार्य, अधिकारी आदींना मार्गदर्शन केले. राऊत यांनी प्रवेश प्रक्रियेत मार्गदर्शन पुस्तिका विद्यार्थ्यांना वितरीत करणे, मुख्याध्यापकांनी दिलेल्या भूमिका कशा बजवाव्या, प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर कोणाची महत्त्वाची भूमिका आहे, प्राचार्याने प्रवेशाबाबत काय कार्यवाही करावी अशा विविध मद्यांवर मार्गदर्शन केले. सोमवारपासून (23 एप्रिल) शाळांच्या प्रशासनाला माहिती पुस्तिका झोन केंद्राहून दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे न्यायच्या आहेत. त्यानंतर शाळांनी त्या 23 ते 27 एप्रिलदरम्यान वितरीत करायच्या आहेत.

शाळांना माहिती पुस्तिका या त्यांच्या झोन केंद्राहून सोमवारी न्यायच्या आहेत. त्यानंतर शाळेने पुस्तिकांचे वितरण करण्याबाबत नियोजन करून त्यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना वितरीत करायच्या आहेत. विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका 150 रुपयांना मिळणार आहे. माहिती पुस्तिका मराठी आणि इंग्रजी, असा दोन्ही भाषेत राहणार आहे. त्यामध्ये कॉलेजांची संक्षिप्त माहिती आणि ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी लॉनलाइन आयडी राहणार आहे. – मिनाक्षी राऊत, सचिव, अकरावी प्रवेश नियंत्रण समिती


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)