सोमनाथ कोरे यांना राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार

सांगवी – पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने दिला जाणार राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार टाटा मोटर्सचे कर्मचारी सोमनाथ कोरे यांना नुकताच कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला.

सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ह. भ. प. भगवान महाराज कोकरे यांच्या हस्ते पुरस्काचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील अशा मोजक्‍याच लोकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

या कार्यक्रमास माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे, जिल्हा परिषदेचे सदस्य भगवान पाटील, महाराष्ट्र महिती अधिकार समितीचे अध्यक्ष नितीन यादव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनकल्याण सामजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)