सोमतवाडीत विद्यार्थ्यांना परदेशी पाहुण्यांकडून स्लिपिंग किट

जुन्नर- परदेशी पाहुण्यांचे वाजत- गाजत स्वागत.. पारंपारिक नृत्य व फेटे बांधून पाहुण्यांचा सन्मान..भारत व कॅनडाच्या राष्ट्रगीताने स्वागत..1000 विद्यार्थी व पालक..वाटप करण्यात आलेल्या स्लीपिंग किटमधील 25 प्रकारचे दर्जेदार शालेय साहित्य मिळाल्यावर चिमुरड्यांच्या चेहऱ्यावरील अवर्णनीय आनंद.. असा हा आनंदमेळावा भरला होता जुन्नर तालुक्‍यातील सोमतवाडी येथील आश्रमशाळेत. निमित्त होते जुन्नर तालुक्‍यातील 80 जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे.
या किटचे वाटप “स्लीपिंग चिल्ड्रन अराउंड द वर्ल्ड’, कॅनडा यांच्या वतीने आणि रोटरी क्‍लब ऑफ कॅन्टोन्मेंट (पुणे), फार इस्ट (पुणे) व नारायणगाव (ता. जुन्नर) यांच्या सहकार्याने पार पडले. यावेळी कॅनेडियन टीम लीडर ख्रिस आणि गेल, तसेच त्यांचे सहकारी, प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद, कॅन्टोन्मेंट रोटरीचे पंकज आपटे, फार इस्टचे हरपाल नारंग, सर्विस डायरेक्‍टर पंकज शाह, योगेश भिडे, ब्रम्हे सर, परवेझ बिलीमोरिया, पंकज पटेल, गटविकास अधिकारी विकास दांगट, गटशिक्षणाधिकारी पांडुरंग मेमाणे, बालविकास प्रकल्प अधिकारी रविंद्र तळपे, खंडेराव ढोबळे, भरत बोचरे, हनुमंत गोपाळे आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)