सोमंथळी येथे श्रमदानातून खड्डे बुजवले

नानासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी व ग्रामस्थांच्यावतीने श्रमदान

कोळकी – सोमंथळी येथील नारायण विष्णु धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयांच्या वतीने रेल्वेलाईन ते करचेवस्तीपर्यंत खड्डे बुजवण्यात आले. सोमंथळी गावात फार मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची दुरावस्था झाली असुन रेल्वेलाईन ते करचेवस्ती व पुढे आसू रस्त्यापर्यंत असणाऱ्या रस्त्याची अवस्था वाईट आहे.रेल्वेलाईन ते करचेवस्ती या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. ]

-Ads-

अनेक वेळा या रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली जात होती. पण संबंधीत विभागाने या रस्त्याच्या कामाकडे काणाडोळा केला होता. संबंधीत रस्त्याने दुचाकी, चार चाकी, ऊसाचे ट्रॅक्‍टर ,ट्रक व इतर वाहनांची वाहतूक करताना फार त्रास होत होता. या रस्त्यावर चरी व खड्डे पडल्याने रस्ता अतिशय खराब झाला होता.

नारायण विष्णु धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांच्या वतीने श्रमदान करण्याचे नियोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने रेल्वेलाईन ते करचेवस्ती या रस्त्याचे श्रमदान करून खड्डे बुजवण्यात आले आहेत.या श्रमदानात सोमंथळी ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)