‘सोफिया’ माउंट एव्हरेस्ट सर करणार 

काठमांडू : मानवाप्रमाणे दिसणाऱ्या जगातील पहिल्या यंत्रमानव ‘सोफिया’ने नवी घोषणा केली आहे. जगातील सर्वाधिक ऊंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला यंत्रमानव होण्याचा मान सोफिया मिळवणार आहे. जगातील अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमता असणारा यंत्रमानव असणाऱ्या सोफियाने काठमांडूत संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाकडून आयोजित एका समारंभात भाग घेतला. माउंट एव्हरेस्टची मोहीम कधी राबवणार याची माहिती मात्र सोफियाने दिली नाही.

सोफिया सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळविणारी पहिली रोबोट आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने विकासाच्या अनेक संधी उपलब्ध केल्याने सोफियाने यावेळी म्हटले. भविष्याकरता पृथ्वीला सुरक्षित करा असे आवाहनही सोफियाने सर्वांना केले आहे. या महिला रोबोटला हाँगकाँगच्या ‘हॅनसन रोबोटिक्स’ नावाच्या कंपनीने तयार केले आहे. मानवी लक्षणांसोबत निर्माण करण्यात आलेला हा पहिलाच रोबोट आहे. सोफियाने नेपाळसारख्या देशातील गरीबी दूर करणे आणि गरीबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी तांत्रिक क्रांती घडवून आणण्याचे आवाहन देखील केले आहे. यंत्र आणि रोबोट जीवनला सुलभ करण्यासाठी निर्माण करण्यात आले आहेत. इंटरनेटच्या मदतीने आम्ही देशाच्या दुर्गम भागाला जगाशी जोडू शकतो. तसेच चांगले शिक्षण, उत्तम सुविधा पुरवू शकतो असे सोफियाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)