सोन्यावरील आयात शुल्क कमी करा ! दागिने उत्पादकांनी अर्थमंत्रालयाकडे मागणी

दागिने उत्पादकांच्या संघटनेची अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

नवी दिल्ली: सोन्यावर अजूनही 10 टक्‍के एवढे आयात शुल्क लावले जाते. भारताची चालू खात्यावरील तूट वाढल्यानंतर रुपयावरील दबाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी हा निर्णय घेतला होता. मात्र, आता ही तूट आटोक्‍यात आली असल्यामुळे सोन्यावरील आयात शुल्क शक्‍य तितक्‍या लवकर कमी करून ते 4 टक्‍के करावे, अशी मागणी दागिने उत्पादकांनी अर्थमंत्रालयाकडे केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दागिने उत्पादक परिषदेचे अध्यक्ष अनंत पद्मनाभन यांनी सांगीतले की, आम्ही अर्थमंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात ही मागणी केली आहे. मंत्री आमच्या या योग्य मागणीचा विचार करीत, अशी आम्हाला आशा आहे. ते म्हणाले की, कट डायमंडवरील सीमा शुल्क 2.5 टक्‍के करण्याची आम्ही मागणी केली आहे.

आयात शुल्क वाढविले असतानाच देशात नोटाबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर जीएसटी लागू करण्यात आला. त्यामुळे या उद्योगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याच्या बाबीकडे आम्ही सरकारचे लक्ष वेधले होते.
मात्र, आतापर्यंत आमच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या उद्योगाची उलाढाल तर कमी झाली आहेच त्याचबरोबर निर्यातही कमी होत आहे. वाणिज्य मंत्रालयाने आमची बाजू योग्य असल्याचे सांगितले आहे. मात्र निर्णय होत नाही, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

ते म्हणाले की, सरकारने गेल्या काही वर्षांपासून सोन्यावरील आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे सोन्याची तस्करी वाढत आहे. त्यामुळे सरकारचा मूळ उद्देश पूर्ण होताना दिसत नाही. त्यानी असेही सांगितले की, 2 लाखांपेक्षा अधिक खरेदीसाठी सरकारने पॅन क्रमांक बंधनकारक केला आहे. ती मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची गरज असल्याचे आम्ही सांगितले आहे. देशातील 50 टक्‍के लोकांकडे पॅन कार्ड नाही. त्यामुळे त्या लोकांना आणि खेड्यातील लोकांना दागिने खरेदी करताना अनेक अडचणी वेळोवेळी येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)