सोन्यापेक्षा निर्देशांकांनी दिला अधिक परतावा…

सरलेल्या वर्षात सोने वाढले केवळ 7.42 टक्‍क्‍यांनी
सरलेल्या वर्षात सोन्याने केवळ 7.42 टक्के म्हणजे 2100 रुपयाचा परतावा दिला आहे. तर चांदीने केवळ 1.47 टक्के म्हणजे 580 रुपयांचा परतावा दिला आहे. आता सोन्याचा दर 30400 रुपये प्रतिग्रॅम तर चांदीचा दर 39900 रुपये प्रति किलो या पातळीवर आहे. जागतिक बाजारात मात्र सोन्याने 13.17 टक्के तर चांदीने 6.48 टक्के इतका परतावा दिला आहे.

मुंबई – नोटाबंदीचा अजूनही रेंगाळलेला प्रभाव आणि जीएसटीच्या अंमलबजावणीनंतरही सरलेल्या वर्षात देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्‍वास कायम राहिला आहे. या वर्षात सोने आणि चांदीपेक्षा शेअरबाजारांनी गुंतवणूकदारांना अधिक परतावा देण्यात यश मिळविले आहे. शुक्रवारी शेअरबाजार एका नव्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश नसूनही आणि तूट व महागाई वाढण्याची शक्‍यता असूनही शुक्रवारी गुंतवणूकदारांनी भावनीक होऊन निर्देशांकांना नव्या उच्चांकी पातळीवर नेले. आता मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 34056 या पातळीवर विराजमान आहे. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टीने 10500 ची हद्द ओलांडून 10530 ची पातळी गाठली आहे.

दुसऱ्या तिमाहीत विकासदर तीन वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेला आहे.त्यात तिसऱ्या तिमाहीत फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था मंदावली असल्याचे शुक्रवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. मात्र परिस्थिती विरोधक जेवढी म्हणतात तेवढी गंभीर नसल्याचा दावा त्यांनी केला. सरकारचा या वर्षात ठरवलेला खर्च आताच पूर्ण झाला आहे. त्यामुळे सरकारला आगामी तीन-चार महिन्यांत मोठ्या प्रमाणात कर्ज तरी काढावे लागणार आहे किंवा मोठ्या प्रमाणात निर्गुंतवणूक तरी करावी लागणार आहे.

-Ads-

सरलेल्या कॅलेंडर वर्षात निर्देशांक 28 टक्‍क्‍यांनी वाढून सर्व कंपन्यांच्या भांडवली मूल्यात तब्बल 45 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर सर्व कंपन्याचे एकूण भांडवली मूल्य 151 लाख कोटी रुपयाच्या वर गेले आहे. या वर्षात सेन्सेक्‍स 7430 अंकांनी वाढला आहे. विकसित आणि विकसनशील देशातील देशापेक्षा भारतीय शेअरबाजारानी या वर्षात चांगला परतावा दिला आहे. या वर्षात 36 कंपन्यांनी आयपीओ काढून यशस्वीही केले. लवकरच सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार बऱ्याच सवलती देण्याची शक्‍यता आहे. या वर्षी झालेली चांगली घडामोड म्हणजे मोठ्या कंपन्यांबरोबरच छोट्या कंपन्यांनीही गुंतवणूकदारांचे लक्ष आकर्षित केले आहे. त्यामुळे मुख्य निर्देशांकाबरोबरच मिडकॅप आणि स्मॉल कॅप विक्रमी पातळीवर गेले आहेत. त्यामुळे आता म्युच्युअल फंडाचेही मिडकॅपमधील कंपन्यांकडे लक्ष लागले आहे. या वर्षी म्युच्युअल फंडानी आणि देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी शेअरबाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी केली. आगामी काळातही हे दोन गुंतवणूकदार भारतात जास्त सक्रिय राहण्याची शक्‍यता आहे. सरलेल्या वर्षात रुपयाच्या मुल्यातही 5.96 टक्‍के इतकी म्हणजे 405 पैशांनी वाढ झाली असून आता डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 63.67 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले आहे. 2016 च्या अखेरीस हे मुल्य 67.92 रुपये प्रति डॉलरच्या पुढे गेले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)