सोन्याच्या बिस्किटांच्या अमिषाने गंडा

पिंपरी – सोन्याची बिस्किटे देतो असे सांगून चोरट्याने महिलेचे दागिने आणि रक्कम घेऊन पोबारा केला. निगडी प्राधिकरण येथे ही घटना घडली.

या प्रकरणी गंगुबाई चन्नबसय्या स्वामी (वय-45, रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली असून तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गंगुबाई या गुरुवारी सकाळी निगडी प्राधिकरण परिसरातून पायी जात होत्या. हॉटेल सावलीजवळ आल्या असता तीन चोरटयांनी त्यांना थांबवले. त्यांच्याकडे असलेल्या लाल रंगाच्या कापडामध्ये सोन्याचे बिस्कीट आहे. याची बाजारात दीड लाख रुपये किंमत आहे. हे बिस्कीट आम्ही तुम्हाला देतो, त्या बदल्यात तुमच्या अंगावरील दागिने आम्हाला द्या, अशी बतावणी केली.

त्यांच्यावर विश्वास ठेऊन महिलेने अंगावरील मंगळसूत्र, कर्णफुले आणि रोख रक्कम असा एकूण 32 हजार रुपयांचा ऐवज घेतला. यानंतर आरोपींनी लाल रंगाचे कापड महिलेला दिले आणि तिथून धूम ठोकली. महिलेने काही अंतर पुढे गेल्यानंतर कापडात खरोखर सोने आहे का, याची खात्री केली असता ते सोन्याचे बिस्कीट नसून नकली धातू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)