सोन्याच्या दुकानात थांबलेल्या महिलेचा ऐवज लंपास

यवत-दौंड तालुक्‍यातील यवत येथील डी. बी. सराफ नावाच्या सोन्याच्या दुकानात थांबलेल्या महिलेच्या पिशवीतून भरदिवसा सोन्याच्या दागिन्यासह रोख रकमेची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 27) सकाळी 11:30 च्या सुमारास घडली. यामध्ये 52 हजारांच्या ऐवजाचा समावेश आहे.
या चोरीप्रकरणी जया हरिश्‍चंद्र जाधव (रा. खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या चोरीसंदर्भात अधिक माहिती अशी आहे की, आज शुक्रवार असल्याने यवत येथील आठवडे बाजार होता. डी. बी. सराफ यांच्या सोन्याच्या दुकानात गर्दी होती. यावेळी दुकानातील काउंटर समोरील मोकळ्या जागेत जया जाधव थांबल्या असताना त्यांच्या जवळील हातातील पिशवीतून 8 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत रुपये 24 हजार 700 रुपये व 27 हजार 300 रुपये रोख रक्‍कम असा एकूण 52 हजार रुपयांच्या ऐवजावर अज्ञात चोरट्याने नकळत डल्ला मारीत चोरून नेला आहे. यवत पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक फौजदार विठ्ठल जगताप करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)