सोन्याचे दुकान फोडून लाखोंचा ऐवज लंपास

जवळा – तालुक्‍यातील जवळा येथील वरदलक्ष्मी हे सोन्याचे दुकान फोडून चोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनेने जामखेड तालुक्‍यात एकच खळबळ उडाली आहे. जवळा येथील सराफ व्यावसायिक शिवानंद कथले हे नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून बुधवारी (9) रात्री झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. काऊंटर उचकटून दोन लाखांचा ऐवज लंपास केला.

गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर जवळ्यात एकच खळबळ उडाली. दुपारी उशीरा शिवानंद कथले यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण हे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सुदर्शन मुंढे यांनी जवळ्यात भेट दिली. तसेच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी तातडीने जवळा गावास भेट देत तपासकाम हाती घेतले. या तपासासाठी जामखेड पोलिसांच्या दोन तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची एक अशा तीन टीम कार्यरत झाल्या आहेत. नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व उस्मानाबाद यांच्या टीमनेही भेट दिली.

मराठवाड्यातील इतर ठिकाणच्या
गुन्ह्यांशी साधर्म्य
जवळ्यात घडलेल्या घरफोडीच्या घटनेत गुन्हेगारांनी जी पध्दत अवलंबवली आहे, तशीच पध्दत अकलूज (सोलापूर), परांडा (उस्मानाबाद), आष्टी (बीड), बुऱ्हाणनगर (नगर) या ठिकाणच्या गुन्ह्यातही वापरली असल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)