सोन्याचे दर गेले 6 वर्षांच्या उच्चांकावर 

नवी दिल्ली: जागतिक चलन आणि शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोने खरेदीत वाढ होत आहे. आजही सोन्याच्या दरात वाढ होऊन सोन्याचे दर आता 6 वर्षांच्या उच्चांकी पातळवीर गेले आहेत. मात्र चांदीला उद्योग क्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे चांदीचे दर कमी झाले.

दिल्ली सराफात बुधवारी स्टॅंडर्ड सोन्याचे दर 30 रुपयांनी वाढून 32500 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेले. तर शुद्ध सोन्याचे दर 30 रुपयानी वाढून 32650 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. बुधवारी तयार चांदीचे दर 40 रुपयांनी कमी होऊन 39900 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले. जागतिक बाजारात आज सोन्याचे दर 0.11 टक्‍क्‍यांनी तर चांदीचे दर 0.17 टक्‍क्‍यांनी वाढले. गेल्या काही दिवसापासून व्यापारयुद्ध आणि चलन बाजारातील घडामोडीमुळे सोन्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक वाढत असल्याचे चित्र भारतात आणि जागतिक बाजारात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)