सोने-चांदी खरेदीची “सुवर्णसंधी’

पिंपरी – सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये सतत होत असलेल्या घसरणीमुळे खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा ओघ वाढू लागला आहे. सध्या पितृपंधरवडा असल्याने व औद्योगिक मागणी देखील कमी झाली असल्याने तसेच जागतिक घडामोडींमुळे सोने आणि चांदीची मागणी घटली आहे. याचा परिणाम दरांवर देखील होताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये शनिवार सोडला तर सोने आणि चांदीचे दर घसरत आहेत. भविष्यात हे दर पुन्हा भरारी घेण्याची शक्‍यता असल्याने दिवाळी व लग्नसराईसाठी आतापासून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बुकींग सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये या दोन मौल्यवान धातुंनी ग्राहकांचा विश्‍वास पुन्हा एकदा संपादन केला आहे. सोन्याचे दर घसरले तरी ठराविक पातळीपर्यंतच घसरतात आणि पुन्हा उभारी घेतात, यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक फायद्याचीच असल्याचे मत आता सर्वसामान्यांमधून व्यक्‍त होऊ लागले आहे.

सोमवारी  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दर पुन्हा घसरले होते. दिल्ली सराफा बाजारातील दरांनुसार चांदी 38950 रुपये किलोपर्यंत खाली उतरली आहे. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 31475 रुपयांपर्यंत आले आहेत. अवघ्या एका महिन्याने दिवाळी आणि त्यानंतर लग्नसराई सुरू होत असल्याने पुन्हा दर वाढू शकतात. भारत हा सोने आणि चांदीतील जगातील सर्वांत मोठ्या ग्राहकांपैकी एक आहे. यामुळे भारतात वाढणारी व घटणारी मागणी सोने आणि चांदीच्या दरांवर परिणाम करतात.

-Ads-

गुंतवणुकीचा पर्याय
शेयर बाजार आणि रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता नसणाऱ्या अथवा माहिती नसणाऱ्या सर्वसामान्यांसाठी सोने आणि चांदी हे दोन धातू गुंतवणुकीचा सर्वांत चांगला पर्याय मानले जातात. कित्येकजण दर उतरण्याची प्रतीक्षा करत असतात. तर महिला वर्ग दसरा आणि दिवाळीसाठी या उतरलेल्या दरातच बुकींग करून घेण्याची संधी साधून घेत आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांचा सोने व चांदीच्या दरांचा आलेख पाहता सोन आणि चांदीने प्रतीक्षा करू शकणाऱ्या गुंतवणुकदारांना निराश केले नाही. चांगले रिटर्न्स मिळत असल्याने कमी आर्थिक क्षमता असणाऱ्या नागरिकांसाठी सोने आणि चांदी हेच गुंतवणुकीचे चांगले पर्याय सिद्ध होत असल्याचे देखील सराफा व्यावसायिकांचे मत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)