सोने-चांदीच्या दरात घसरण

मुंबई : सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यास हरकत नाही. सध्या देशभरात लग्नसराईचा काळ सुरु आहे आणि त्यातच अक्षय्य तृतीयेचाही मुहूर्त जवळ येत आहे. या लग्नसराईत आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येते.

 

स्थानिक बाजारातील मागणीत घट झाली आणि जागतिक बाजारात मंदीचे सावट दिसून आल्याने सोने दरात घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सोने दर ३५० रुपयांनी घसरले आणि ३१,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. तसेच चांदी दरामध्येही घसरण पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात २५० रुपयांनी घट होऊन ३९,७५० रुपये किलोचा दर राहिला. सराफा व्यवसायात स्थानिक दुकानदारांकडून मागणी कमी होत आहे. त्यामुळे सोने बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.

न्यूयॉर्कमध्ये गुरुवारी सोने दर १.३७ टक्के घट होऊन १,३३४.३० डॉलर प्रती औंस राहिले. चांदीचा दर १.३५ टक्के घटून १६.४३ डॉलर प्रति औंस होता. दिल्लीच्या सऱाफा बाजारात ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ३५०-३५० रुपयांनी अनुक्रमने ३१,८०० आणि ३१.६५० रुपये १० ग्रॅम खाली आली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)