सोने खरेदी 20 टक्‍क्‍यापर्यंत वाढेल…

अक्षय्य तृतीयेमुळे दागिने उत्पादकांना विश्‍वास 
मुंबई – सोन्याचे दर सध्या जरी जास्त आहेत. मात्र बाजारातील एकूण वातावरण पाहता या अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या विक्रीत 15 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढेल, अशी आशा दागिने उत्पादकांनी व्यक्त केली आहे. एक तर बाजारातील वातावरण चांगले आहे, त्याचबरोबर सोन्याचे दर सध्या स्थिर आहेत. लग्नसराई येत आहे. या कारणामुळे सोन्याची विक्री वाढेल असे काही दागिने उत्पादकांनी सांगितले. सध्या सोन्याचे दर काही प्रमाणात 30800 रुपयांच्या पातळीवर स्थिर आहेत. त्यामुळे ते कमी जास्त होतील याबाबत ग्राहकांच्या मनात कमी शंका आहेत. त्यातच लग्नाचे मुहूर्त जवळ येत आहेत. त्यामुळे ग्राहक दुहेरी संधी साधण्याची शक्‍यता आहे.

जेम ऍण्ड ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी सांगितले की, हिऱ्याच्या दागिन्यापेक्षा सोन्याच्या दागिन्याला जास्त मागणीची शक्‍यता आम्हाला वाटते. त्याचबरोबर फार महाग दागिन्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल कमी होत आहे. त्यामुळे उत्पादक त्या अनुषंगाने दागिन्याच्या रचनेत बदल करताना दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. लग्नासाठी दगीणे बनविण्याच्या ऑर्डरमध्ये वाढ झाली आहे, असे ते म्हणाले. याबाबत बोलताना कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष टी. एन. कल्याणरामन यांनी सांगितले की, जीएसटी आणि इतर कारणांमुळे असंघटित क्षेत्राकडील ग्राहक आता संघटित क्षेत्राकहे वळू लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारतातील दागिने उत्पादकांची संघटित बाजारपेठेत आगामी काळात मजबूत होण्यात मदत मिळणार आहे. गेल्या वर्षी पाऊस चांगला पडूनही नोटाबंदी आणि जीएसटीमुळे विक्री फारशी वाढली नव्हती. मात्र यावर्षी पाऊस चांगला पडणार आहे, त्यामुळे विक्री जास्त होईल, असे वाटते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)