सोने आयात धोरणात बदल नाही

नवी दिल्ली – आणखीही परदेशातून भारतात सोने येण्याचे प्रमाण खूूप आहे. त्यामुळे सध्याच्या कडक अश्‍या सोने आयात धोरणा बदल करण्याचा सरकारचा कसलाही विचार नसल्याचे सरकारने संसदेत सांगीतले. उद्योगराज्य मंत्री सी. आर. चौधरी यांनी सांगितले की, सध्याचे सोने आयात धोरण सरकारला योग्य वाटते. दागिने उद्योगाने मात्र सोन्याच्या आयातीवरील शुल्क कमी करण्याची मागणी केली आहे. सोन्याची उपलब्धता कमी असल्यामुळे दागिन्याच्या निर्यातीवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर देशातील रोजगार निर्मितीवर नकारात्मक परिणाम झाला असल्याचे दागिने उत्पादकांचे म्हणणे आहे.

ते म्हणाले की, या विषयावर अर्थसंकल्प सादर करतांना विचार झाला आहे. आयात शुल्क कमी केल्यास सरकारचा महसूल कमी होईल. त्यामुळे आयात शुल्कात कपात करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्यात 2.89 अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले. सोन्याची आयात कमी व्हावी आणि देशातील सोने वापरता यावे याकरीता सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)