सोनेसांगवी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अण्णापूर- शिरूर तालुक्‍यातील सोनेसांगवी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती साजरी करण्यात आली. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात आणि त्यानंतर बुदधविहारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्य प्रतिमेचे पूजन सोनेसांगवीचे सरपंच दत्तात्रय कदम यांच्या हस्ते करून अभिवादन केले. याप्रसंगी उपसरपंच मल्हारी काळे, रांजणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत भोसले, पोलीस-पाटील भानुदास खोमणे, युवा उद्योजक संभाजी डांगे, सलीमभाई शेख, पोलीसमित्र भाऊसाहेब शेळके, ग्रामपंचायत सदस्य सुनील शेळके, ग्रामसुरक्षा दलाचे कार्यकर्ते शरद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस हवालदार तुषार पंधारे, अमोल चव्हाण, अर्चना यादव, ग्रामपंचायत सदस्य यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जातीय सलोखा राखत ग्रामविकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी पोलीस उपनिरीक्षक शशिकांत भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच दत्तात्रय कदम यांनी, सूत्रसंचालन विठ्ठल पाडळे आणि यादव पाडळे यांनी केले. कैलास पाडळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)