सोनेसांगवीत दोन गटात तुंबळ हाणामारी

रांजणगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद : वर्गणीचे पैसे ऑकेस्ट्रासाठी खर्च करण्यावरून पेटला वाद

रांजणगाव गणपती – सोनेसांगवी (ता.शिरुर) येथील याञेच्या वर्गणीचे पैसे ऑकेस्ट्रासाठी खर्च करण्यासाठीच्या झालेल्या वादातून दोन गटामध्ये मारहाण होऊन परस्परविरोधी फिर्याद रांजणगाव पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचे रांजणगाव पोलिसांनी सांगितले. बाबूराव राजाराम डांगे आणि रविंद्र पोपट काळे यांनी एकमेकांच्या विरोधात रांजणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी रविंद्र पोपट काळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार संदीप तुळसीराम डांगे, बाबूराव राजाराम डांगे, दत्ताञय तुळसीराम डांगे, शिवाजी प्रभाकर डांगे, हिरामण प्रभाकर डांगे, पप्पू विठोबा डांगे, अवधूत शिवराम डांगे यांनी बेकायदा गर्दी जमवून याञेच्या वर्गणीचे पैसे ऑकेस्ट्रासाठी खर्च करण्यासाठीच्या झालेल्या वादातून सोनेसांगवी (ता.शिरुर) येथे गुरुवारी (दि.29) सायंकाळी 4.30 मिनिटांनी लोखंडी गज आणि काठ्यांनी मारहाण केली आहे.
याबाबत बाबूराव राजाराम डांगे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविंद्र पोपट काळे, प्रमोद शांताराम डांगे, राहुल बाबाजी कदम, वैभव नारायण खिलारे, काळूराम ऊर्फ कल्पेश शांताराम डांगे, निलेश पोपट डांगे यांनी याञेच्या वर्गणीचे पैसे ऑर्केस्ट्रासाठी खर्च करण्यासाठीच्या झालेल्या वादातून बेकायदा गर्दी जमवून दगडाने आणि काठीने मारहाण केली. बाबूराव डांगे यांच्या मोटारसायकल आणि चारचाकीचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दोन्ही गटांवर बेकायदा गर्दी जमवून मारहाण केली असल्याचे गुन्हे दाखल केल्याचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले. याचा पुढील तपास ए.आर.चमनशेख आणि तुषार पंधारे हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)