सोनेवाडी येथील ग्रामसभेत हाणामारी

नगर – नगर तालुक्‍यातील सोनेवाडी ( चास ) येथील ग्रामसभेत हाणामारीची घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी कि, फिर्यादी नितीन उत्तम दळवी ( उपसरपंच रा.सोनवाडी ता.जि.अ .नगर ) यांनी ग्रामसभा चालू असतांना ग्रामपंचायतीच्या जमिनीची थकलेली भाडेपट्टी भरण्यास सांगितल्याचा राग येवून आरोपी गोरख जगन्नाथ दळवी याने जमिनीची थकलेली बाकी देणार नाही.

तसेच जमिनीचा ताबाही देणार नाही. असे म्हणून संरपंचाच्या दिशेने दगड फेकूुन मारला. परंतु प्रसंगावधान राखत सरपंचांनी तो दगड हुकविला. त्यानंतर आरोपी जालींदर सुभाष दळवी, रामनाथ संपत कराळे, रावसाहेब जयवंत कापसे, राहुल चंदक्रांत कांबळे, अभिजित बबन गुंजाळ,सागर अंकुश दळवी, अमोल अकुंश दळवी,शुभम महादेव सुंबे ,वृत्तीक भैरवनाथ कराळे, महादेव रंगनाथ सुंबे (रा.सोनेवाडी,चास, ता.जि.अ.नगर ) यांनी ग्रामसभेत गोंधळ घालत ग्रामसभा बंद पाडली. तसेच फिर्यादीस लाथाबुक्कयांनी मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपींविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)