सोनेमियॉं यात्रोत्सवात अनेकांनी केली नवसाची पूर्ती

शेवगाव: शेवगावचा सोनेमियॉं यात्रोत्सव म्हणजे येथील हिंदू मुस्लीम ऐक्‍याचे प्रतिक आहे. सध्या या यात्रोत्सवाचे निमित्ताने शेकडो हिंदु-मुस्लीम शहरवासीयांनी दर्ग्यास फुलांच्या चादरी अर्पण करुन नवसाची पूर्ती केली.
चार दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवानिमित शनिवारी रात्री विविध वाद्याच्या निनादात संदलची मिरवणुक निघाली.

शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, स्पंदन अँण्ड गोल्डन ग्रुप, शेर ए हिन्दुस्तान क्रीडा मंडळ, इंडीयन लायन्स ग्रुप, कुरेशी यंग पार्टी, एस्‌ टी, पोलिस ठाणे आदी संस्थासह अनेक वैयक्तिक मंडळींनी फुलांच्या चादरींची मिरवणुक काढुन त्या दर्ग्यावर अर्पण केल्या. रविवारी लोकनाटय तमाशा तर सोमवारी रात्री मीना तब्बूसूम (मुझफरनगर) व सलीम सौजादा (नागपुर) यांच्यात कवालीचा मुकाबला होणार आहे. तर मंगळवारी कुस्त्यांचा जंगी हगामा होणार आहे. राष्ट्रवादीच्या वतीने पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाकार्याध्यक्ष संजय कोळगे, शहराध्यक्ष ताहेर पटेल, पंचायत समिती सदस्य कृष्णा पायघन, वहाब शेख, तुफेल मुलानी, मुबीन तांबोळी, चॉंद शेख, नगरसेवक सागर फडके, अजय भारस्कर, कैलास तिजोरे, राजु सय्यद, आश्‍पाक पठाण, समीर शेख आदी उपस्थित होते. यात्रा समितीचे अध्यक्ष गणेश कोरडे, उपाध्यक्ष उमर शेख, खजिनदार वजीर पठाण, नंदकुमार सारडा, सलीमभाई शेख, भारत चव्हाण, दिगंबर काथवटे यात्रोत्सवाचे नियोजन करत आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)