सोनू निगमला पाठिंबा दिल्याने दोघांना चाकूने भोसकले

भोपाळ : गायक सोनू निगमने मुस्लिम धर्मियांच्या अजानबाबत केलेल्या ट्‌विटवरून निर्माण झालेला वाद काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. कारण या वादाला हिंसक वळण लागल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर सोनूला पाठिंबा देणाऱ्या दोघांना भोसकल्याने हा वाद चिघळण्याची शक्‍यता दिसत आहे.
सोनूला पाठिंबा देणाऱ्या मध्य प्रदेशच्या दोन युवकांना चांगलेच महागात पडले आहे. सोनू निगमचे समर्थन केल्याने मुलांच्या एका गटाने त्यांना चाकूने भोसकले. ही घटना उज्जैनमधील फ्रीगंज भागात घडली. दोघा मित्रांना संशयितांनी चाकू भोसकून जखमी केले आहे. गायक सोनू निगम याने अजानची नमाज लाऊडस्पीकर आवाजावरून ट्‌विट केले होते. यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर सोनूवर टीका झाली. तर अनेकांनी पाठिंबा दिला. त्यानंतर सोनूने पत्रकार परिषद घेत आपल्या मुद्द्यावर ठाम असल्याचे सांगितले होते. दरम्यान, सोनूला समर्थन देणारेही पुढे आले होते. उज्जैनच्या शिवमने फेसबुकवरील एका पोस्टमध्ये यापुढे आपण आता फक्त सोनू निगमचेच गाणे ऐकणार असे म्हटले होते. त्यावरून फैजान खान नावाच्या एका मुलाने आपल्या 7 ते 8 मित्रांसह शिवमला त्याच्या या पोस्टबद्दल जाब विचारला आणि त्याला चाकूने भोसकले. या वेळी शिवमबरोबर त्याचा मित्रही होता. त्यालाही या टोळक्‍याने भोसकले. दोघांवर रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा संबंधित युवकावर दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)