सोनी वाहिनीने दिला सलमानला जोरदार झटका

सलमान खानच्या चाहत्यांनी ‘रेस3’ ला बॉक्सआॅफिसवर डुबण्यापासून वाचवले. पण छोट्या पडद्यावर मात्र चाहतेही त्याला वाचवू शकले नाहीत. कारण ‘बिग बॉस’ होस्ट करणा-या सलमानचा ‘टीआरपी’ कमी होऊ लागला आहे आणि परिणामी सोनी वाहिनीने सलमानला जोरदार झटका दिला आहे. सलमान खान अलीकडे या चॅनलवर ‘दस का दम’ हा रिअ‍ॅलिटी शो घेऊन परतला होता. पण दुर्दैवाने या शोला प्रेक्षक जमवता आले नाहीत. त्यामुळे चॅनलने आता या दीड तासांच्या शोचा टाईम स्लॉट सरळ सरळ अर्ध्या तासांनी कमी केला आहे. आता हा शो केवळ एका तासाचा असेल. कमीत कमी एक तासाचा शो तर प्रेक्षक बघतील, असे चॅनलला वाटत आहे.

खरे सांगायचे चॅनलने योग्यरित्या प्रमोट न केल्यामुळे या शोला चांगले ओपनिंग मिळू शकले नव्हते. साहजिकच पहिल्याच दिवसांपासून शोचे रेटींग घसरले आणि घसरतचं गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरूवातीला या शोला केवळ 0.9 ते 1.0 पर्यंतचं रेटींग मिळू शकले. शोचा ‘रेस3’ स्पेशल एपिसोडही फ्लॉप गेला होता. ‘रेस3’ला समीक्षकांनी फार दाद दिली नव्हती. पण केवळ सलमानच्या चाहत्यांमुळे पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने तग धरला. पण दुस-या आठवड्यात चित्रपटाने पलटी खाल्ली. ‘रेस3’च्या दुसºया आठवड्याचे कलेक्शन पहिल्या आठवड्यापेक्षा कितीतरी कमी होते. या दुस-या आठवड्यात हा चित्रपट २५ कोटींचा बिझनेस करेल की नाही, याबद्दलही जाणकारांना शंका वाटतेय. यानंतर चित्रपटाकडून कुठलीही अपेक्षा करता येणार नाही. कारण येत्या शुक्रवारी रणबीर कपूरचा ‘संजू’ चित्रपटगृहांत झळकत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)