सोनी ये! तर्फे लहान मुलांसाठी ७५ दिवस अविरत मनोरंजनाचा आनंद!

सोनी ये! या मुलांच्‍या मनोरंजनासाठी असलेल्‍या अंतिम गंतव्‍याने लहान मुलांमध्‍ये आवडीचे टीव्‍ही चॅनेल म्‍हणून आपले स्‍थान निर्माण केले आहे. उत्‍सवी हंगामाधील आनंददायी व उत्‍सवी महिन्‍यांमध्‍ये अधिक आनंदाची भर करण्‍यासाठी ही वाहिनी टीव्‍हीवरील ‘पार्टी ७५’सह सर्व लहान चाहत्‍यांना खास गिफ्ट्स देत आहे. या पार्टीमध्‍ये नवीन वर्षाच्‍या स्‍वागतापर्यंत नवीन एपिसोड्स व चित्रपटांचा समावेश आहे. ज्‍यामुळे मुलांना ७५ दिवस अविरत पार्टी व अमर्यादित मनोरंजनाचा आनंद मिळणार आहे. १५ ऑक्‍टोबरपासून सुरू झालेली ही पार्टी आपला उत्‍साह कायम राखत १ जानेवारीपर्यंत सुरू राहील.

दिवाळी, ख्रिसमस व नवीन वर्ष या आगामी सणांमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करत वाहिनीने मुलांसाठी हे क्षण संस्‍मरणीय करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. पार्टी ७५ मध्‍ये ‘किको’ व ‘सुपर स्‍पीडो’ या लोकप्रिय शोच्‍या नवीन एपिसोड्सचा समावेश असेल. किको नवीन घातक खलनायकांसह चांगल्‍यासाठी त्‍याचा लढा सुरूच ठेवेल. म्‍युझिकल जोडी ‘गुरू और भोले’ त्‍यांच्‍या नवीन एपिसोड्ससह अधिक म्‍युझिक व नृत्‍याचा आनंद देतील. हनी बनी आणि त्‍यांच्‍या गँगमधील गंमत ‘सब झोलमाल है’च्‍या नवीन एपिसोड्ससह अधिक मजेशीर होईल. पार्टी येथेच थांबत नाही, सर्वांची लाडकी जोडी हनी बनी पूर्वीपेक्षा अधिक उत्‍साही तीन नवीन चित्रपटांसह उत्‍साहाचा स्‍तर वाढवणार आहेत. लहान मुले’हनी बनी इन द कुंग फू चॅलेंज’ सह एक किंवा दोन किक शिकतील. ‘हनी बनी इन हॉंटेंड हाऊस’ थरारक अनुभव देईल. तसेच ‘हनी बनी अॅज सुपर टीम एक्‍स’सह ‘टीम’ शब्‍दाला नवीन अर्थ मिळणार आहे. हे प्रत्‍येक नवीन एपिसोड्स व चित्रपट लहान मुलांना चित्रपट पाहण्‍याचा सुपर ये! अनुभव देतील.

टेलिव्हिजनवर पार्टी उत्‍साहात असताना ऑन-ग्राऊण्‍ड पार्टीमध्‍ये देखील तितकाच उत्‍साह आहे. सोनी ये!ने ८३ शहरांमध्‍ये पार्टी ७५ वॅन आणल्‍या. या वॅनच्‍या माध्‍यमातून लहान मुलांना पार्टी ऑन व्‍हील्‍ससह आकर्षक गेम्‍स व गिफ्ट्सचा आनंद मिळाला आणि या वॅन देशभरातील मुलांना मोठ्या प्रमाणात आनंद देत आहेत. सोनी ये! मुले असलेल्‍या प्रत्‍येक ठिकाणापर्यंत पोहोचते. सर्व सणांचा भाग म्‍हणून आयोजित करण्‍यात येणा-या कार्निवल्‍स आण्यिा राज्‍यातील इंटरअॅक्‍शन्‍सच्‍या माध्‍यमातून मुलांना त्‍यांच्‍या आवडीच्‍या कार्टून्‍सना भेटण्‍याची संधी मिळते. सोनी ये! सह त्‍यांच्‍या सोशल व्‍यासपीठांवरील व्‍हर्च्‍युअल इंटरअॅक्‍शन देखील पार्टी ७५ थीममध्‍ये भर करण्‍यात आला आहे. आकर्षक पार्टी ७५ ‘मूव्‍ह टू ग्रूव्‍ह’ स्‍पर्धा मुलांना त्‍यांचा पार्टी पोशाख परिधान करत सोनी ये! च्‍या पात्रांसोबत पार्टीचा आनंद घेण्‍याची सुविधा देते. मुले सोनी ये! वर डिजिटली शेअर केलेले त्‍यांचे नृत्‍य देखील पाहू शकतात.मुलांना त्‍यांचे ”पार्टी रेडी” फोटो पाठवण्‍यासाठी प्रोत्‍साहित केले जाते. यामधून त्‍यांना पार्टीला जाण्‍याची आणि त्‍यांच्‍या आवडत्‍या कार्टून्‍सना भेटण्‍याची संधी मिळू शकते.

सोनी ये! चा या उत्‍सवी सीजनमध्‍ये मुलांना आनंद व संस्‍मरणीय क्षण देण्‍यावर विश्‍वास आहे. पार्टी ७५ चॅनेलच्‍या या विश्‍वासाला पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न करते. या पार्टीमध्‍ये मुलांना ७५ दिवस अविरत त्‍यांच्‍या आवडीच्‍या कार्टून्‍सचे नवीन अवतार पाहायला मिळतात.

आम्‍ही आमच्‍या ऑफरिंग्‍जच्‍या माध्‍यमातून मुलांना सर्वोत्‍तम मनोरंजन देण्‍यावर नेहमीच फोकस दिला आहे. उत्‍सवी सीजन हा प्रत्‍येक मुलासाठी वर्षातील सर्वात आवडीचा क्षण असतो. त्‍यांना त्‍यांच्‍या आवडीच्‍या शोजचे नवीन कन्‍टेन्‍ट आणि नवीन चित्रपट देण्‍यासह त्‍यांच्‍या उत्‍साहामध्‍ये अधिक भर करण्‍याचा दुसरा आनंद कोणताच नाही. माझ्यातर्फे प्रत्‍येक प्रेक्षक व त्‍यांच्‍या कुटुंबाला मौजमजेने भरलेल्‍या सुट्टीच्‍या हंगामाच्‍या शुभेच्‍छा आणि पार्टी ७५ सह मी आशा करते की आमच्‍या ऑफरिंग्‍ज त्‍यांच्‍या चेह-यावर हास्‍य आणतील.

– लीना लेले दत्‍त, व्‍यवसाय प्रमुख, सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍स इंडिया


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)