सोनिया किंवा प्रियांका गांधी रायबरेलीतून यापुढे जिंकून येणार नाहीत -दिनेश प्रताप सिंह

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या रायबरेलीतून बंडाचे आवाज निघत आहेत. त्यामुळेच आता पक्षाचे नेते दिनेश प्रताप सिंह हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दिनेश प्रताप सिंह यांनी पक्ष सोडत असताना अहामी लोकसभा निवडणुकीत सोनिया किंवा प्रियांका गांधी रायबरेलीतून निवडून येणार नसल्याचे म्हटले आहे.

दिनेश प्रताप सिंह हे शनिवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. त्याआधी त्यांनी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे. तसेच २०१९ ला सोनिया आणि प्रियंका गांधी कोणीही रायबरेलीतून निवडून येणार नाही असे म्हटले आहे. माझ्या लहान भावाला अर्थात राकेश सिंहला २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळीच भाजपाने तिकिट देऊ केले होते. मात्र माझ्या शब्दाखातर त्याने ते घेतले नाही. माझ्या भावाला काँग्रेस पक्षाने तिकिट द्यावे अशी विनंती मी प्रियंका गांधींना केली होती. त्यांनी माझी विनंती धुडकावून लावली आणि रायबरेलीतून कोणत्याही ठाकूर समाजाच्या माणसाला तिकिट देणार नाही असे म्हटले. मात्र नंतर त्यांनी माझ्या भावाला हरचंदपूर येथून तिकिट दिले. काँग्रेसने मात्र सिंह यांचे आरोप बिनबुडाचे आहेत त्यांनी त्यांच्या लहान भावासाठी कधीही तिकिटाची मागणी केली नव्हती असे म्हटले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)