सोनिगरा ज्वेलर्समध्ये खरेदीची “दिवाळी’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वांत जुनी आणि परंपरा व विश्‍वास जपणाऱ्या दिलीप सोनिगरा ज्वेलर्समध्ये ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर वैविध्यपूर्ण कलाकुसरीचे दागिने सोनिगरा ज्वेलर्सने उपलब्ध करुन दिल्याने महिला वर्ग याठिकाणी खरेदीसाठी आकर्षित होत आहेत.

दिवाळी सणाला आवर्जून सोने खरेदी केली जाते. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरही सराफी पेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. दिवाळी सणानिमित्त महिलांना मनाजोगते कलाकुसरीचे दागिने खरेदी करता यावेत यासाठी पारंपारिक दागिन्यांसह अनेक नाविन्यपूर्ण दागिने देखील उपलब्ध करुन दिले आहेत. आपली हक्काची पेढी म्हणून सोनिगरा ज्वेलर्समध्ये वर्षानुवर्षे काहीजण सोने खरेदी करतात. दरवेळी नवनवीन कलाकुसरीचे दागिने सोनिगरा ज्वेलर्समध्ये पहायला मिळतात. त्यामुळे खरेदीचा मोह आवरता येत नाही, अशी प्रतिक्रिया काही ग्राहकांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोनिगरा ज्वेलर्सच्या चिंचवडगाव, हिंजवडी, चाकण, कामशेत, रहाटणी, तळेगाव दाभाडे येथील शाखांवर ग्राहकांची तुडूंब गर्दी पहायला मिळत आहे. धनत्रयोदशीला गुंजभर का होईना मुहुर्ताचे सोने खरेदी करावे, अशी परंपरा आहे. त्यामुळे धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून सोनिगरा ज्वेलर्समध्ये ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. दिवाळी पाडव्यासाठी महिला वर्गांकडून दागिने घडवण्यासाठी अगाऊ बुकींग देखील करण्यात येत असल्याची माहिती सोनिगरा ज्वेलर्सकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)