कवठे – क्रीडा शिक्षक प्रकाश सोनावणे यांना मिळालेल्या राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊट गाईड पुरस्काराने ज्याप्रमाणे शिवाजी विद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले आहे त्याचप्रमाणे विरमाडे गावच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला आहे. या पुरस्काराबद्दल खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नुकताच त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी उदयनराजे भोसले यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
सुरुर येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर अभिषेक यादव युवा मंचच्यावतीने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे बक्षीस वितरण नुकतेच पार पडले. या कार्यक्रमासाठी खा. उदयनराजे भोसले, किसन वीर कारखान्याचे संचालक प्रताप यादव, विकास शिंदे, विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद यांच्यासह राजकीय तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी सुरुरच्या शिवाजी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले विरमाडे, ता. वाई गावचे सुपुत्र प्रकाश सोनावणे यांचा राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊट गाईड पुरस्कार मिळाल्याबद्दल खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले, प्रकाश सोनावणे यांच्या बहुमुल्या योगदानामुळेच त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे शाळेच्या लौकिकात भर पडलीच आहे. परंतु, त्यांच्या या कामगिरीमुळे त्याच्या गावचे नावही मोठे झाले आहे. भविष्यातही त्यांनी तंदुरस्त युवक घडविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये मैदानी खेळांविषयी आवड निर्माण करण्याचे कार्य करावे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा