“सोनाली बेंद्रे’च्या निधनाच्या अफवेमुळे गोल्डी बहल संतापले

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या मेटास्टैटिक कॅन्सरशी झुंज देत आहे. तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये सध्या उपचार सुरु आहेत. शुक्रवारी तिच्या निधनाबद्‌दल अफवा पसरली होती. ही बातमी सोनालीचा पती गोल्डी बहल याच्यापर्यंत पोहचली आणि त्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला आणि लोकांना ट्विट करत एक आवाहन केले.
भाजपाचे आमदार राम कदम यांनी सोनाली बेंद्रे हिच्या निधनाचे चुकीचे ट्विट केले होते. चुकीचे ट्विट केल्याने लोकांकडून ट्रोल झाल्यानंतर कदम यांनी ते चुकीचे ट्विट हटवले.

या अफवेबद्‌दल सोनालीचा पती गोल्डी बहल यांनी संताप व्यक्त केला आहे. गोल्डी यांनी ट्विटरवर अशी बातमी पसरवणाऱ्या लोकांना चांगलच सुनावल आहे. गोल्डी बहल याने ट्विट करत म्हटले आहे की, मी लोकांना आवाहन करतो की, कृपया सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा. कोणत्याही अफवेवर लगेच विश्वास ठेवू नका आणि त्याची शहानिशा न करता ती अफवा पसरवून संबंधितांना त्रास देऊ नका’. धन्यवाद.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)