चाकण- शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील शेतकरी कुटुंबातील सोनाली दिनकर पोतले ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षा 2017 या परीक्षेत उत्तीर्ण झाली असून, तिची कृषी अधिकारीपदी निवड झाली आहे. ग्रामीण भागातून आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून मराठी माध्यमातून शिकलेली, तसेच एकत्र कुटुंबात वाढलेली सोनाली हिच्या निवडीमुळे सर्व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेलपिंपळगाव येथील श्री शिवाजी विद्यालयात तिचे शालेय शिक्षण झाले.महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथे एम एस्सी ऍग्रीचे पदव्युत्तर शिक्षण तिने पूर्ण केले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आणि विरोधीपक्ष नेते योगेश बहल यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंगेश हिंगणे सरकार मित्र परिवार, तिचे चुलते सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पोतले, बंधू संजय पोतले, माऊली पोतले, वैभव पोतले आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)