सोनालीला आदर्श विद्यार्थिनीचा फिरता करंडक

पिरंगुट इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, सेवकांचा सत्कार

पिरंगुट- येथील बालवीर युवक मंडळाच्या वतीने पिरंगुट इंग्लिश स्कूल मधील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व सेवकांचा सत्कार करण्यात आला. तर श्री शिवराय मित्र मंडळाचे संस्थापक संतोष पवळे यांच्याकडून सोनाली दोडके या विद्यार्थिनीला आदर्श विद्यार्थी म्हणून फिरता करंडक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालवीर युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. तानाजी किसनराव पवळे यांच्या स्मरणार्थ इ. 5 वी ते 10 वीतील गुणवंत विद्यार्थी स्वराली कोरे, विराज गावडे, वैष्णवी नेटके, ऐश्‍वर्या अंजुटगी, साक्षी सातपुते, सुप्रिया गायकवाड यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याबरोबर पिरंगुट व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, श्रीदत्त प्रिंटिंग प्रेसचे डायरेक्‍टर कै. मच्छिंद्र ज्ञानोबा पवळे यांच्या स्मरणार्थ पिरंगुट इंग्लिश स्कुलचे प्राचार्या एस. बी. लाडके, शिक्षक सचिन गार्डी, शिक्षिका ज्योती तरटे यांना आदर्श शिक्षक, हेमंत साळुंके यांना आदर्श लिपिक, संजय दाभाडे व रविंद्र पायगुडे यांचा आदर्श सेवक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी संगिता पवळे, मंदा पवळे, दिलीप पवळे, प्रकाश पवळे, चांगदेव पवळे, रमेश पवळे, ज्ञानेश्‍वर पवळे, मोहन गोळे, दिलीप गोळे, वैभव पवळे, राजाभाऊ वाघ, महादेव गोळे, चांगदेव निकटे, सुरेखा पवळे, ललिता पवळे, मनिषा पवळे, सुप्रिया धोत्रे, हेमलता मंडले, जनाबाई गोळे, स्वाती गोळे, छाया पवळे, वैशाली नवाळे, शेखर गोळे, अशोक ओव्हाळ, भानुदास गोळे, बापू पवळे, विशाल पवळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)