सोनालिकाचे दोन हेवी ड्यूटी ट्रॅक्‍टर 

पुणे: सोनालिका इंटरनॅशनल ट्रॅक्‍टर्सने किसान, पुणे एक्‍सपोमध्ये सोनालिका ट्रॅक्‍टर्सची हेवी ड्यूटी श्रेणी सादर केली.
कंपनीने आज तांत्रिकदृष्ट्य्‌ा प्रगत ट्रॅक्‍टर्स असलेल्या 28एचपी श्रेणीमध्ये जीटी 28 आणि 50एचपी श्रेणीमध्ये आएक्‍स 47 सिकंदर 4डब्ल्यूडी अशाप्रकारे भिन्न एजपी श्रेणीमध्ये दोन मॉडेल्स सुरू केली, त्यासोबतच कंपनीने 50एचपी श्रेणीमध्ये आरएक्‍स47 सिकंदर 2डब्ल्यूडी व इतर श्रेणीचे सादरीकरण केले.

सोनालिका ग्रुपचे कार्यकारी संचालक रमन मित्तल म्हणाले की, हे एक अत्यंत प्रतिष्ठित प्रदर्शन होते जेथे आम्ही 28 पासून ते 90 एचपीपर्यंत आमच्या हेवी ड्यूटी उत्पादन श्रेणीचे प्रदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित, श्री. विवेक गोएल, वरिष्ठ उपाध्यक्ष, सोनालिका ग्रुप म्हणाले, किसान पुणे सारखा कृषी मेळावा, हा आमच्यासाठी शेतकऱ्यांसोबत जोडले जाण्याचा आणि ट्रॅक्‍टरमध्ये वापरल्या जाणाऱ्या नवीन तंत्रांबद्दल त्यांना शिक्षित करण्याचा महत्त्वाचा मंच आहे, ज्याद्वारे त्यांना तसेच एकंदर समाजाला मदत होते. आम्ही महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या लाभासाठी विविध मॉडल्सवर जवळपासच्या अनेक ऑफर्स सादर केल्या आहेत. आता या 2 नव्या आरंभांसह, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर्ण उत्पादन श्रेणी ऑफर करणारी आम्ही एकमेव कंपनी बनलो आहोत. विक्री/सेवा केंद्रामुळे महाराष्ट्रामधील आमची अस्तीत्व वाढले आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)