सोनाक्षी सिन्हा “मुंगडा’च्या तालावरा थिरकणार 

सोनाक्षी सिन्हा सध्या अभिषेक बर्मन दिग्दर्शित “कलंक’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये सोनाक्षी एक जबरदस्त आयटम सॉंगवर परफॉर्मन्स देणार आहे. 1977 मध्ये गाजलेल्या “इनकार’मध्ये एक गाजलेले गाणे होते “हा मुंगडा, मै गुड की कली’ त्या मूळ गाण्यामध्ये हेलन यांनी हिट ऍन्ड हॉट परफॉर्मन्स दिला होता. याच गाण्याचे नूतनीकरण “कलंक’मध्ये करण्यात आलेले असेल, असे सोनाक्षीने सांगितले. यापूर्वीही सोनाक्षीने हेलन यांच्या एका गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स केला होता.
“हॅपी फिर भाग जायेगी’मध्ये “चिन चिन चू’साठी हेलनचा डान्स होता. आता पुन्हा एकदा तशाच हिट गाण्याच्या रिक्रिएशनमध्ये परफॉर्म करायला मिळणार म्हणून सोना खुषीत आहे. “मी टू’बाबत अन्य कलाकार मंडळींनी मत व्यक्‍त करायला सुरुवात केली असताना सोनाक्षीलाही प्रतिक्रिया विचारली गेली. जर खरेच शोषण झाले असेल, तर संबंधित महिलांनी जरूर आवाज उठवावा आणि ज्यांच्यावर आरोप केले गेले असतील, त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, असे सोनाक्षी म्हणाली. स्टार किड असल्यामुळे तिच्याबाबतीत असा अनुभव येण्याची कोणतीही शक्‍यता नाहीच. पण ज्यांच्या ऍक्‍ट्रेसेसनी असे आरोप केले आहेत, त्यांच्याबाबत तिला पूर्ण सहानुभूती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)