सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांना आवडे गॉसिप !

लहान मुलांमधील अभिनयगुणांचा शोध घेणारा ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ हा कार्यक्रम त्यातील स्पर्धकांच्या अफलातून आविष्काराने आणि या लहान मुलांच्या नाटकीपणामुळे प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात बॉलीवूडची नामवंत तारका सोनाक्षी सिन्हा आपल्या “हॅप्पी फिर भाग जाएगी” या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी सहकलाकार जस्सी गिल याच्यासह या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. यावेळी परीक्षक व अभिनेत्री हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यात बराच काळ गुफ्तगूं सुरू होते आणि त्यांनी बॉलीवूडमधील तारे-तारका तसेच अन्य विषयांवर भरपूर गॉसिपिंग केले.

कार्यक्रमाचा सूत्रसंचालक शंतनू माहेश्वरीने या दोघींच्या गप्पांकडे बघून त्यांना एक प्रश्न विचारला की दोन तारका भेटतात, तेव्हा त्या कोणत्या विषयावर गप्पा मारतात? त्यावर दोघींनी एकच उत्तर दिले- “गॉसिप!” सोनाक्षी म्हणाली, “आम्हा दोघींना गॉसिप करायला खूप आवडतं आणि आम्ही जेव्हा एकत्र भेटतो, तेव्हाही आम्ही आमच्या सहकलाकारांविषयी गप्पा मारीत असतो. ते सेटवर कसे उशिर येतात, तयार होण्यास कसा भरपूर वेळ घेतात, ते त्यांच्या केसांबाबत किती हळवे असतात वगैरे विषयांवर आम्ही गप्पा मारतो.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)