सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा आरोप 

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुरादाबाद येथे राहणाऱ्या प्रमोद शर्माने सोनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रमोद शर्मा हा इंडियन फॅशन ऍण्ड ब्युटी अवार्डसचा मालक आहे.
30 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीत इंडिया फॅशन ऍण्ड ब्युटी अवार्डसचे आयोजन करण्यात आले होते. या अवार्डस शोसाठी सोनाक्षीला बोलवण्यासाठी टॅलेंट फुलऑन कंपनीचा संचालक अभिषेक सिन्हा आणि एक्‍सीड एंटरटेनमेंटशी संपर्क साधण्यात आला होता.

या कंपनीच्या माध्यमातून सोनाक्षीला एकूण 28 लाख 17 हजार रूपये देण्यात आले. यानंतर 21 जूनला अभिषेकच्या कंपनीने प्रमोद शर्मासोबत लेखी करारही केला. या करारापश्‍चात दिल्लीला होणाऱ्या या इव्हेंटमध्ये सोनाक्षी येणार अशी होर्डिंगही लागलीत. मात्र 30 सप्टेंबरला ऐन कार्यक्रमाच्या दिवशी सोनाक्षीने आयोजकांना 10 वाजताची फ्लाईट रद्द करून सव्वा तीनची फ्लाईट बुक करण्यास सांगितले. आयोजकांनी 64 हजारांत दोन तिकिटे बुकही केली. पण तरिही सोनाक्षी या शोला आली नाही. सोनाक्षी न आल्याने गर्दीने कार्यक्रमात गोंधळ घातला. आयोजकांना यामुळेही नुकसान सोसावे लागले. काल शनिवारी आयोजकांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
20 :heart:
8 :joy:
3 :heart_eyes:
4 :blush:
6 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)