सोनाक्षी सिन्हाने सहकाऱ्यांची केली अशी चेष्टा

सलमान खान आणि अजय देवगण हे नेहमीच सोनाक्षी सिन्हाची चेष्टा करत असतात. मात्र दर वेळी त्यांना तशी संधी मिळतेच असे नाही. सोनाक्षी सिन्हालाही कधी संधी मिळाली, तर ती आपल्या सहकलाकारांची भन्नाट चेष्टा करायला मागे पुढे बघत नाही.

“क्रेझी हम’ या आगामी चित्रपटाच्या सेटवर तिने आपल्या सहकाऱ्यांची अशीच चेष्टा केली. तिने “क्रेझी हम’च्या असिस्टंट डायरेक्‍टरच्या मायक्रोफोनवरून आवाज बदलून स्वतःच्या, सोनाक्षी सिन्हाला बोलावल्याची घोषणा केली. त्यामुळे असिस्टंट डायरेक्‍टर धावतच सोनाक्षीला शोधायला बाहेर पडला. थोड्या वेळात स्वतः सोनाक्षीनेच ही अनाउन्समेंट केली होती, हे लक्षात आले.

“क्रेझी हम’च्या सेटवर सोनाक्षीने ही धमाल कित्येकवेळा केली. असिस्टंट डायरेक्‍टरच्या वॉकीवरून तिने अनेकवेळा स्वतःच्याच नावाची अनाउन्समेंट केली आणि सगळेजण सोनाक्षीला म्हणजे तिलाच शोधायला लागायचे. डायरेक्‍टर चक्री तोलेतीच्या शेजारच्याच खुर्चीवर बसून सोनाक्षी हा उद्योग करत बसायची आणि 15 मिनिटे तरी सेटवर तिलाच शोधायची धावपळ चालायची. “क्रेझी हम’मध्ये सोनाक्षी आणि गायक दलजीत दोसांझ हे मुख्य भूमिकेत आहेत. न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. पण हा चित्रपट रिलीज कधी होणार हे निश्‍चित झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)