“सोनाई’चे दीड लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दीष्ट

  • प्रवीण माने : कारखान्याचा बॉलयर अग्नि प्रदिपन

रेडा – सोनाई कृषी प्रक्रिया कारखान्यात दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाणार असून हंगामाची गुरुवारी (दि. 18) रोजी सुरुवात होणार असल्याची माहिती कारखान्याचे संचालक तथा जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.
शारदेय नवरात्री उत्सवाच्या मुहूर्तावर इंदापूर तालुक्‍यातील वरकुटे येथील (सोनाईनगर) येथे असणाऱ्या सोनाई परिवाराच्या सोनाई कृषी प्रक्रिया कारखान्याचा बॉयलर प्रदीपन समारंभ आज (बुधवारीए) सोनाई कारखान्याचे संचालक किशोर माने यांच्या हस्ते सपत्नीक पार पडला, त्यावेळी प्रवीण माने बोलत होते. याप्रसंगी कारखान्याचे संचालक हरीश्‍चंद्र माने, किशोर माने, सोनाली माने, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, चंद्रकांत देवकर, किरण देवकर, भारत बोंगाणे, निलेश रणदिवे, मोहन लावंड, अंकुश लावंड आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रवीण माने म्हणाले की, कारखान्याचा हा 12 वा बॉयलर प्रदीपन आहे. गेली बारा वर्षे शेतकरी, सभासद, वाहतूकदार, कर्मचारी, तोडणीदार यांच्या सहकार्याने सामंजस्याने आणि एकोप्याने गेले 11 गाळप हंगाम हे मोठ्याप्रमाणात यशस्वीरित्या पार पडले. याचे श्रेय सोनाई परिवाराचे सर्वेसर्वा दशरथ माने यांचे आहे. व सोनाई कृषी प्रक्रिया कारखान्याची वाटचाल सर्वांच्या साथीत अशीच बहारदारपणे होत राहील, यासाठी सर्व शेतकारी बांधव आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी यापूर्वीसारखेच सहकार्य करावे. तसेच गुळ पावडरच्या मागणीच्या कमतरतेमुळे वर्ष तसे मंदीचे गेले, तरीही शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव योग्यवेळी देऊन कारखाना आणि शेतकरी यांच्यातील संबंध सौदाहार्याचे ठेवले आहेत. तसेच गेली 11 वर्षे याच पद्धतीने शेतकरी बांधवांना न्याय देण्यात आला.
यंदा इंदापूर तालुक्‍यामध्ये असणाऱ्या दुष्काळजण्य परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांसमोर मोठे पेच प्रसंग निर्माण झाले आहेत. यासाठीच सोनाई परिवारातर्फे ऊस, डाळिंब परिसंवाद आयोजित केली आहे. या परिसंवादामार्फत शेतकऱ्यांना शेतीतज्ज्ञांच्या वतीने मार्गदर्श केले जाणार असल्याचे माने यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)